नळदुर्ग ,दि. २६ : शिवाजी नाईक
शहरातील जगदंबादेवी (अंबाबाई) देवस्थान ट्रस्ट संचालित श्री अंबाबाई मंदिरात नवरात्र महोत्सवा निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जाधव यांनी दिली.
नळदुर्ग शहर व परिसरातील भाविक भक्तासाठी नवरात्र महोत्सव श्री अंबाबाई मंदिर येथे मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार असुन पुढीलप्रमाणे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सोमवार दि २६ रोजी नवरात्रारंभ घटस्थापना ,
मंगळवार दि २७ रोजी सांयकाळी संगीत खुर्ची (वय ६ ते १० वर्षांतील) मुले व मुलीकरिता , दि २८ रोजी सायंकाळी ५ वाजता संत ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ , महिला भजनी मंडळ यांचा कार्यक्रम, दि २९ रोजी कु. नम्रता शिवाजी नकाते (मुर्टा) हिचे "आजची स्त्री" या विषायावर सायंकाळी ५ वाजता व्याख्यान होणार आहे, तर दि ३० रोजी कुंकुमर्जन दुपारी ३ ते ४:३० वाजता,त्याचबरोबर दि ०१ रोजी महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम सायंकाळी ५ ते ७ वाजता आयोजित करण्यात आले आहे.
दि ०२ रोजी रांगोळी स्पर्धा सकाळी ११ वाजता, आराधी गीतांचा कार्यक्रम तुळजाभवानी आराधी ग्रुप, चिकुंद्रा (सायं ५ ते ७ पर्यंत),
दि ०३ रोजी सचिव महा.रा.खादी उद्योग उस्मानाबादचे विद्या गोर्वधन डोईफोडे
यांचे "महिला लघु- उद्योग" या विषयावर सायंकाळी ५ वाजता मार्गदर्शन , कन्या पूजन (७ वर्षा खालील मुली) वेळ सायं.६ वाजता , दि ०४ रोजी होम- हवन व अजबळी, परडी भरणे कार्यक्रम (सायं ५वा), दि ०५ रोजी सीमोल्लंघन सोहळा सायंकाळी ५ वाजता देवीच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
नवरात्र कालावधीत दररोज पहाटे ५.३० वाजता आभिषेक , दररोज सायंकाळी ७ वाजता महाआरती होणार आहे. त्याचबरोबर मनिष हजारे , रत्नाकर कुलकर्णी , यशवंत बेले , संजय मोरे , भिमाशंकर बताले , बलदेवसिंह ठाकुर , मारुती ,घोडके , युगंधरा मैत्रीण ग्रुप, अक्षरवेल महिला ग्रुप , राजकुमार खद्दे , शशिकांत पुदाले , दत्ताञ्य दासकर , बाबा कटके, विजयकुमार धरणे , नितीन कासार , बाबासाहेब पिचे आदीच्यावतीने फराळ व फळे वाटप करण्यात येणार आहे.
ज्या भक्तांना प्रसाद वाटप करायचे असेल ईच्छुकानी सायंकाळी ५ ते ७ वाजता वाटप करण्याचेआवाहन करुन भाविक भक्तांनी नळदुर्ग येथील श्री अंबाबाई मंदिर हे अतिशय प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. मागील वर्षापासून मंदिर जीर्णद्धाराचे काम सुरू आहे. अनेक भाविक भक्तांनी सढळ हाताने मदत केलेली आहे. त्या सर्वांचे आभारी आहोत. जीर्णद्धाराचे काम सुरूच आहे. संरक्षण भिंत व खोली, भोजन हॉल बांधकाम यासाठी आपण देणगी स्वरूपात सहकार्य करण्याचेही आवाहन श्री जगदंबादेवी (अंबाबाई) देवस्थान ट्रस्ट नळदुर्ग श्री अंबाबाई मंदिर जीर्णोद्धार समिती व नवरात्र महोत्सव समिती यानी केले आहे.
मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई तुळजाई स्पीकर्स व मंडप कॉन्ट्रॅक्टर नळदुर्ग तर्फे प्रवीण जाधव यानी तर प्रसिध्दी पञक राजेंद्र महाबोले यानी केले आहे.