चिवरी,दि.२६:

 तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या  नवरात्र महोत्सवास  सोमवाार   दि.२६ रोजी  घटस्थापनेने प्रारंभ झाला आहे. 

घटस्थापनेच्या दिवशी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये पहाटे  देवीला महा अभिषेक ,महापूजा, महाआरती करण्यात आली.  यानंतर   मंदिराच्या गाभार्‍यात भक्तिमय वातावरणात घटस्थापना करण्यात आली. यावेळी आई राजा उदो उदो च्या जयघोषानेे परिसर दुमदुमूूून गेला होता.  नवरात्रोत्सवामध्ये मंदिरात आरास बसणे, आराधी गीते, सुहासिनींना फराळाचेे वाटप करणे, आदी धार्मिक कार्यक्र केले जातात .

  
मागील दोन वर्षापासून कोरोना महामारी च्या पार्श्वभुमीवर मंदिर बंद असल्यामुळे नवरात्र  महोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला होता. यंदा माञ निर्बंध मुक्त उत्सव साजरा होत असल्याने  भाविकांमध्येेेे उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे .
 
Top