काटी, दि.२५
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील मुख्याध्यापक रमजान पठाण यांची उमरगा तालुक्यातील माडज बीट अंतर्गत विस्तार अधिकारीपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल शनिवार 24 रोजी काटी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक अमिन शेख यांच्या हस्ते सावरगावचे मुख्याध्यापक रमजान पठाण यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सहशिक्षिक तानाजी शेळके, इंद्रजित जंगले, राजेंद्र कापसे, सुधीर बोंदर,भारत कटकदोंड, गोविंद जोशी, श्रीमती सविता पवार, रेखा कोळी, विद्युलता आलाट,सुषमा माने आदी मान्यवर उपस्थित होते.