काटी, दि. २५
उस्मानाबाद जिल्हा अम्युचर ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या परंडा येथे खुल्या गटातील जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकूलमधील विद्यार्थी आनंद मुद्दे याने 3 कि.मी. स्टिपल चेस क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावित गोल्ड मिळवून घवघवीत यश संपादन केले.
तसेच पुढील होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी उस्मानाबाद जिल्हा संघात निवड झाली. आनंद मुद्दे हा विद्यार्थी तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी विद्या संकूलात शिक्षण घेत असून तो मुख्याध्यापक अण्णा कोल्हटकर, विठ्ठल म्हेत्रे, क्रीडा मार्गदर्शक माऊली भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. या स्पर्धेत 3 कि.मी. स्टिपल चेस क्रीडा प्रकारात आनंद मुद्दे याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या यशाचे भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र वैदू, उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, सचिव विवेक आयचित अशोक संकलेचा, सतीश कोळगे, तर डॉ.पुरी, शाळेचे मुख्याध्यापक अण्णा कोल्हटकर, विठ्ठल म्हेत्रे यांच्यासह ग्रामस्थ,पालकांनी विशेष कौतुक केले आहे.