तुळजापूर दि २५ डॉ. सतीश महामुनी


नवरात्राच्या निमित्ताने महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या तीन राज्यांमधून खूप मोठ्या संख्येने भावीक श्री क्षेत्र  तुळजापुरात येणार असल्याने  भाविकांच्या सोयीकरिता  प्रशासनाने उपाय योजना केले आहेत.

 दुपारी बारा वाजता  नवरात्र महोत्सवाची यजमान श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी  डॉ. कौस्तुभ दिवेगावकर हे सपत्नीक घटस्थापना विधीला बसणार आहेत. परंपरागत पद्धतीने मंदिर संस्थांनच्या यजमानपदी उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असण्याची परंपरा आहे. 


दि.२६ सप्टेंबर रोजी पहाटे व सकाळी श्रीदेवीजींची अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य व दुपारी १२  वाजता घटस्थापना तर सायंकाळी अभिषेक, पंचामृत, महापूजा, नैवेद्य, आरती व रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. या महोत्सवात दि.२६ सप्टेंबर ते दि.१० ऑक्टोबर  या कालावधीत शारदीय नवरात्र महोत्सवाचे धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.

  दि.२६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते व सर्व मानकरी, पुजारी व पाळेकरी यांच्या उपस्थितीत विधिवत घटस्थापना करण्यात येईल. तर मंगळवार दि.२७ सप्टेंबर रोजी सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळा श्री देवीजींची अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य, आरती व रात्री छबिना मिरविण्यात येणार आहे. तसेच बुधवार ‌दि.२८ सप्टेंबर रोजी सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळा श्री देवीजींची अभिषेक पंचामृत महापूजा नैवेद्य आरती व रात्री छबिना काढण्यात येणार आहे. 

 गुरुवार दि.२९ सप्टेंबर रोजी श्रीदेवीची अभिषेक पंचामृत रथ अलंकार महापूजा, नैवेद्य, आरती व सायंकाळी अभिषेक आरती व रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच शुक्रवार दि.३० सप्टेंबर रोजी ललित पंचमी दिनी श्री देवीजींची पंचामृत मुरली अलंकार महापूजा, नैवेद्य, आरती, सायंकाळी अभिषेक आरती व रात्रीचे छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर शनिवार दि. १ ऑक्टोबर रोजी श्री देवीजींची अभिषेक पंचामृत शेषशाही अलंकार महापूजा, नैवेद्य, आरती, सायंकाळी अभिषेक आरती व रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच रविवार दि.२ ऑक्टोबर रोजी श्री देवीजींची अभिषेक पंचामृत भवानी तलवार अलंकार महापूजा, नैवेद्य, आरती, सायंकाळी अभिषेक आरती व रात्रीचे छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे.

 सोमवार दि.३ ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी दिनी श्री देवीजींची अभिषेक पंचामृत महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा सकळी ११.३० वाजता वैदिक होमास व हवनास आरंभ तर दुपारी ४.४५ वजता पूर्ण होतील व रात्रीचे छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच मंगळवार दि. ४ ऑक्टोबर रोजी महानवमी (खंडे नवमी) श्री देवीजींची नित्योपचार महापूजा, दुपारी १२.०० वाजता होमावर अजाबली आपली व घटोत्थापन (घट उठविणे) दिवसभर नैवेद्य, दर्शन व रात्री पलंग पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर बुधवार दि.५ ऑक्टोबर रोजी विजयादशमी (दसरा) उष:काली श्री देवीजींची शिबिकारोहन, मंदिराभोवती मिरवणूक व मंचकी निद्रा विजयादशमी सार्वत्रिक सिमोल्लंघन तसेच रविवार दि.९ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा दिनी पहाटे श्री देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना नित्योपचार पूजा ,अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य, आरती व रात्रीचा छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे 

 सोमवार दि.१० ऑक्टोबर रोजी मंदिर पौर्णिमा व सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळा श्री देवीजींची अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य, सोलापूर काठ्यासह आरती व रात्रीचे छविना मिरवणूक काढण्यात येणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिरात धार्मिक पूजा, विधी व सेवा आदी कार्यक्रम करण्यात येणार आहेत.

भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय

 तुळजाभवानीच्या ऑनलाईन दर्शनासाठी WWW.shrituljabhavani.in या संकेतस्थळावरुन दर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे.

नवरात्र कालावधीमध्ये घाटशिरस रोड येथून भाविकांना दर्शनासाठी येणार आहे. 25 हजार भावीक उभे राहतील असा 250 बाय 200 1 आकाराचा भव्य मंडप उभारण्यात आला आहे येथे पोलीस व्यवस्था पुरेशी तैनात करण्यात आली आहे. मदत केंद्र, चप्पल स्टैंड आणि इतर अत्यावश्यक सेवा येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
 
Top