तुळजापूर , दि.२७ :
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने तुळजापूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यांचा पुर्णाकॄती पुतळा बसविण्याच्या कामाचे भुमीपुजन ८ दिवसात करण्यात यावे, तसेच शिल्पकाराची थकीत देयक रक्कम अदा करण्यात यावी, या मागणीसाठी नगरपरिषदे समोर निदर्शने करण्यात आले .
याप्रसंगी रिपाइं कार्यकर्त्यांनी नगरपरिषद समोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने आंदोलन करून वरील मागणीचे निवेदन न.प. कार्यालय प्रमुख वैभव पाठक याना दिले. यावेळी रिपाइंचे आंनद पांडागळे,तानाजी कदम, अमोल कदम, विष्णु सोनवने, भास्कर पांडागळे,रवी वाघमारे,आप्पा कदम, अंकुश माने,ज्ञानदेव कदम,तानाजी डावरे,मेसा मडमे,दत्ता हावळे, सुरेश पांडागळे,साहील रोकड़े,धोंडीबा काळुंके सह कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी प्रशासनाने तातडीची पावले उचलली पाहिजेत. वेळेची बचत करून लवकरात लवकर पुतळा उभारावा अशी मागणी या निमित्ताने रिपाईचे तानाजी कदम यांनी बोलून दाखवली.