अणदूर,दि.०६
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील संजीवनी सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. यंदा अणदूर व परिसरातील10 शिक्षकांना ,शिक्षक दिनाचे औचित्य साधून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत,लवकरच या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत केले जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ नागनाथ कुंभार यांनी दिली आहे.
गत 15 वर्षापासून दरवर्षी होतकरू, हुशार, कामात योग्य शिक्षकांना हे मानाचे पुरस्कार संस्थेच्या वतीने दिले जातात,शिक्षण क्षेत्रात मनापासून सेवा देणाऱ्या, उपक्रमशील शिक्षक,विद्यार्थ्यांप्रति तळमळ असणाऱ्या शिक्षकांची निवड करण्यात आली असून त्या मध्ये प्रदीप कदम,यशवंत मोकाशे, किरण गायकवाड, लक्ष्मण नरे, रंजना स्वामी, शिवदास भागवत, भीमाशंकर जळकोटे, शुभदा कुलकर्णी, सुषमा बिराजदार, सिद्धाराम पाटील आदी शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.