चिवरी, दि.०७ :राजगुरू साखरे
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे सार्वजनिक मंडळ इंदिरानगर यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून दि, ७ रोजी येथील दत्तू पाटील अण्णा माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रारंभी मुख्याध्यापीका श्रीमती एल.के .बिराजदार यांच्या हस्ते श्रीं ची आरती करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती .एल.के.बिराजदार सहशिक्षक शहाजी मस्के, किसनसिंग ठाकुर, किरणकुमार सूर्यवंशी, एस.बी.शिंदे, एस.एम.शिंदे, प्रकाश जाधव,बी.बी. शिंदे , सहशिक्षिका श्रीमती सुरेखा ढगे आदी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष विजय कुलकर्णी, उपाध्यक्ष विक्रम बारुळे, शिवानंद पाटील, अतुल पाटील, तानाजी जाधव, प्रकाश राजमाने, सुभाष जाधव, सुभाष शिंदे, सोमनाथ शिंदे, उत्तम गायकवाड, मल्हारी गायकवाड, कैलास शिंदे , पांडुरंग घोडके आदीसह ग्रामस्थ उपस्थित होत.