काटी,दि.०७

तुळजापूर तालुक्यातील काटी विविध कार्यकारी  सेवा सोसायटीचे शंभर टक्के  वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन विक्रमसिंह देशमुख व सेक्रेटरी साळुंके यांना सन्मानित करण्यात आला.

 ग्रामीण भागात आपल्या सामाजिक गरजा, आकांक्षा पूर्ण करायचे असेल व शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करायचा असेल तर यासाठी शेतकऱ्यांना शेतीला  मुख्य आधार असतो तो विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा.
       


तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कामधेनू म्हणून समजली जाणारी काटी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची मार्च  2022 अखेर शंभर  टक्के वसूली झाली. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल मंगळवार  रोजी दुपारी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या 38 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष बापुराव पाटील, उपाध्यक्ष मधुकर मोटे, संचालक सुनील चव्हाण यांच्या हस्ते सोसायटीचे चेअरमन विक्रमसिंह देशमुख व सोसायटीचे सेक्रेटरी संजय साळुंके यांचा सत्कार करण्यात आला.
    ‌

याप्रसंगी डिसीसी बॅंकेचे संचालक नानासाहेब पाटील, सुनिल चव्हाण, ज्ञानेश्वर पाटील, सुरेश बिराजदार, बळवंत तांबारे,नागप्पा पाटील, विक्रम सावंत, संजय देशमुख, प्रविण कोलते, सुनिल शिरापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top