तुळजापूर, दि. २८ डॉ सतीश महामुनी
शारदीय नवरात्र महोत्सव तिसऱ्या माळेच्या निमित्ताने पुणे येथील तुळजाभवानीचे भक्त प्रवेश कैलास पेटकर यांनी केलेली मंदिर परिसरातील नेत्रदीपक फुलांची सजावट आणि हजारो भाविक भक्तांनी तुडुंब भरलेले दर्शन मंडप अशी वैशिष्ट्ये पाहावयास मिळाली .रात्री उशिरापासून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी कायम होती. सायंकाळी साडेनऊ नंतर ही गर्दी जास्त प्रमाणात वाढली गेली आणि दर्शन मंडपाचे चारही मजले भाविकांच्या गर्दीने तुडुंब भरलेले दिसून आले .
आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो जयघोषात ग्रामीण भागांमधून आलेल्या भाविक भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. भवानी मातेच्या दर्शनाची आस या भाविकांना लागलेली स्पष्टपणे जाणवत होती . श्री तुळजाभवानी मंदिर कैलास पेठकर रा. पुणे यांनी शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त श्रीदेवीजींचा गाभाऱ्यात व मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक उत्तम दर्जाचे उत्कृष्ट अशी सजावट केलेली आहे . फुलांची सजावट करण्यासाठी पुणे येथील 30 कुशल कला कलाकार मंदिरामध्ये फुलांचे काम केले आहे.
देवीचे भक्त पेटकर परिवार यांनी तुळजाभवानी देवीची श्रद्धा पूर्वक ही फुलांची सजावट केल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान मंदिर संस्थांच्या वतीने या परिवाराचा सत्कार करण्यात आला.
यानिमित्ताने त्यांच्या कुटुंबाचा मंदिर संस्थानच्या वतीने व्यवस्थापक प्रशासन योगिता कोल्हे यांनी श्री देवीची प्रतिमा व साडी, फोटो, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक विश्वास कदम, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, मंदिर कर्मचारी गणेश नाईकवाडी, संकेत वाघे व सुरक्षा रक्षक आदी उपस्थित होते .
तुळजाभवानी देवीचा गाभारा सिंह गाभारा भवानी शंकर परिसर यमाई आणि इतर उपदेवतांची मंदिरे ओवरी होमकुंड निंबाळकर दरवाजा राजे शहाजी महाद्वार राजमाता जिजाऊ महाद्वार गोमुखतीर्थ अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही फुलांची अत्यंत आकर्षक सजावट करण्यात आल्यामुळे शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीचे हे आकर्षण ठरले