काटी , दि. ३० :उमाजी गायकवाड


 तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील इयत्ता आठवी मधील 22 पैकी 18 विद्यार्थ्यांनी एन.एम.एम.एस परिक्षेत सुयश संपादन करून शिक्षण क्षेत्रात "सावरगाव जिल्हा परिषद पॅटर्नचा "दबदबा असल्याचे परीक्षेतील सुयशाने अधोरेखित केले आहे. 


सन 2020-21 मध्ये घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस परीक्षेमध्ये सावरगाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील 22 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते त्यापैकी 18 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून या सर्व शिष्यवृती धारक विद्यार्थ्यांना प्रत्येकी बारावी पर्यंत प्रतिमाही एक हजार स्कॉलरशीप मिळणार आहे. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे व आदर्श शिक्षकांना गौरविण्यासाठी येथील ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांच्या हस्ते "गुणवंतांचा सत्कार सोहळा"या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या आवारात करण्यात आले होते. 


या दिमाखदार सत्कार सोहळ्यात NMMS परिक्षेत घवघवीत यश संपादन केलेले परिक्षार्थी समर्थ गाबणे, कालिदास लिंगफोडे, अजिंक्य दरेकर, समर्थ डोके,समिक्षा मेंगले, हर्षदा मुळे, रिया फंड, आदित्य माळी, अभिनव काळदाते, सुदर्शन तानवडे, साक्षी डोके, वैष्णवी पवार, भाग्यश्री डोके, प्राची भडंगे, समर्थ मेंगले, प्राजक्ता भडंगे,विश्वराज सुरवसे, श्रेयस कांबळे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा तर शाळेचे आदर्श मुख्याध्यापक संदीप वाघ, आदर्श सहशिक्षक मोहन भोसले, राहुल सुरवसे, विशाल सुर्यवंशी, प्रकाश गोळसगाव, मोहन धोत्रे, रमाकांत गुरव, महादेवी कोरे आदींसह परिचारिका मंडोदरी माळी,जया काळे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हरि शेडुळे, श्रीमती अलकनंदा बिराजदार, श्रीमती नवल धाकपाडे, श्रीमती अनुराधा भोसले, श्रीमती स्मिता क्षिरसागर, अमोल मेलगिरी, अनिल दहिटनकर, जयश्री कुंभार, मनिषा पाटील आदींचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार   सोहळा पार पडला. 


या गौरव सन्मान सोहळ्यात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट तर शिक्षक व परिचारिकांना ट्रॉफी, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव म्हणाले की, येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देत या शाळेतील NMMS प्रतिक्षेत 18 विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याचे पाहून ही जिल्हा परिषदेची शाळा निश्चितच उल्लेखनीय काम करत असल्याचे सांगून या शाळेची गुणवत्ता शहरातील विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारी असल्याचे सांगत सावरगावची जिल्हा परिषद शाळा जिल्ह्यात एक वेगळे "मॉडेल" म्हणून ओळखली जाईल असे मत व्यक्त करुन शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, शालेय व्यवस्थापन समितीचे कौतुक केले. या सत्कार सोहळ्याचे बहारदार सुत्रसंचलन विशाल सुर्यवंशी तर आभार राहुल सुरवसे यांनी मानले.
 

 याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, केंद्रप्रमुख सोलंकर,जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील,सरपंच रामेश्वर तोडकरी, उपसरपंच आनंद बोबडे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राम पाटील,शंकर शिंदे,सुधीर मगर,अमोल काळदाते, अंगणवाडी सुपरवायझर श्रीमती शिंदे, प्रा.कानिफनाथ माळी,रमेश चौगुले,चंद्रकांत गाबणे,शाळेचे मुख्याध्यापक संदीप वाघ, सहशिक्षक मोहन धोत्रे, रमाकांत गुरव, भास्कर मस्के,श्रीमती कोरे, महादेवी मॅडम, धनाजी चौरे, प्रकाश घोळसगाव ,नितीन गायकवाड गणपत होनमोटे, राहुल सुरवसे, मोहन भोसले,   विशाल सूर्यवंशी,पंडित सर, रामेश्वर साळुंके,श्रीमती काळे,श्रीमती घोडके आदी मान्यवरांसह ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top