तुळजापूर, दि. १

स्थानिक लेखा निधी महाराष्ट्र राज्य मुंबई आयुक्त महादेव नागरगोजे यांनी  कुटुंबीयांसह  नवरात्र महोत्सवात  श्री . तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर तुळजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्या हस्ते त्यांचा  सत्कार करण्यात आला.

 
 यावेळी तुळजापूर नगरपालिकेचे  कार्यालयीन अधिक्षक श्री.वैभव पाठक, अंतर्गत लेखापरीक्षक श्री.राहूल मिटकरी, स्थानिक लेखा निधी कार्यालय उस्मानाबाद येथील लेखाधिकारी श्री.भोंडे पाटील, श्री.विजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्री.संजयकुमार बोंदर, श्री.आनंद दादा कंदले  आदी उपस्थित होते.
 
Top