तुळजापूर,दि.३० ,

प्रयत्नांतील सातत्याने हमखास यश प्राप्ती होते असे मत स्पर्धा परीक्षा कार्यशाळेत प्रा.सुर्वे यांचे प्रतिपादन


  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे स्पर्धा परीक्षा विभागाच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली, यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा.एस.यु सुर्वे हे बोलत होते.


   प्रतिकुल परिस्थिती ही आपणांस यश प्राप्तीसाठी अडसर ठरु शकत नाही,अभ्यासाला उत्तम नियोजनाची व मार्गदर्शकाची गरज असते, युवकांना स्पर्धेचे स्वरूप लक्षात यणे आवश्यक आहे,स्पर्धा परीक्षांसाठी वेग वेगळे प्रश्न संच अभ्यासावेत लोक सेवा आयोग किंवा संघ लोकसेवा आयोग या परीक्षांचे प्राथमिक व मुख्य परीक्षांच्या अभ्यासक्रमात झालेले बदल आणि त्या अनुषंगाने विविध विषयांवर आधारित अभ्यास ग्रंथाचे संकलन व्यवस्थित करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ एस एम मणेर म्हणाले की, आपण आपला चेहरा शोधला पाहिजे,केवळ आरशात पाहून सौंदर्य प्राप्त होत नाही,खरे सौंदर्य हे आत्मविकासातून प्राप्त होत असते,आत्मविकास हा अभ्यासातून प्राप्त होत असतो, आपण स्वत:चा आदर्श बनले पाहिजे, प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनविले पाहिजे, माणसाच्या जीवनात यशस्वीतेसाठी संघर्ष हाच एकमेव महामार्ग आहे,भाग्यवादी माणसाला यश प्राप्त होत नाही,सतत अभ्यास हेच यशाचे सूत्र आहे असे सूतोवाच त्यांनी यावेळी व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेजर डॉ वाय.ए.डोके यांनी केले तर आभार विभाग प्रमुख प्रा जी व्ही बाविस्कर यांनी मानले. यावेळी प्रा.बी जे कुकडे,प्रा.व्ही.एच चव्हाण, डॉ आर बी रोकडे तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
 
Top