काटी, दि. ०१

तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील एकलव्य  विद्या संकूलात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दि.1 रोजी सकाळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन  करुन जयंती साजरी करण्यात आली. 
    

 यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महादेव शेंडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना गांधीजींनी सांगितलेल्या अहिंसा तत्वांविषयी माहिती सांगितली. 
   

 या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन सविता गोरे यांनी केले होते.तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी अक्षरा पवार तर आभार विद्यार्थिनी सृष्टी कोळी हिने मानले.या कार्यक्रमास विठ्ठल म्हेत्रे,अण्णा कोल्हटकर तसेच सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top