अणदुर ,दि. ०१
अणदूर शहर पत्रकार संघाचे संस्थापक तथा जेष्ठ पत्रकार राजकुमार स्वामी यांची अध्यक्षपदी तर सचिवपदी लक्ष्मण दुपारगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अणदूर येथील सोसायटी सभागृहात शुक्रवार दि.३० रोजी झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी गुरुनाथ कबाडे हे होते. सन १९८९ साली स्थापन झालेल्या या संघाची नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे - उपाध्यक्ष गुरुनाथ कबाडे, कोषाध्यक्ष लिंबाजी सुरवसे, सहसचिव कैलास बोगरगे यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सदस्य सतीश राठोड, नागेश करपे,कल्याण करपे,राहुल कांबळे, किरण कांबळे,नरेंद्र स्वामी,प्रवीण गुरव उपस्थित होते. यावेळी पत्रकार संघाचे पुढील ध्येय धोरणे, विविध सामाजिक उपक्रम याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. निवडी नंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले तर नागेश करपे यांच्या आभाराने बैठकीची सांगता झाली.