तुळजापूर दि.०१ डॉ. सतीश महामुनी
श्री . तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेऊन दसरा मेळाव्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या नीलम गोरे ह्या तुळजापूरहुन मुंबईला रवाना झाल्या . यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ शामल पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
तुळजाभवानीच्या दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी मुंबई येथे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद असणारी भवानी ज्योत घेऊन जात आहोत, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या 61 तीर्थक्षेत्रामधून "उदे ग आंबे उदे" या संकल्पनेनुसार ठाकरे यांना आशीर्वाद देण्यासाठी ज्योत यात्रा येत आहेत. त्यातील एक ज्योत यात्रा आपण स्वतः घेऊन मुंबईला रवाना होत आहोत अशी माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेची करण्यात आलेली अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे आगामी काळात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे समर्थन निश्चित करतील असा विश्वास त्यांनी याप्रसंगी बोलून दाखवला. अत्यंत चुकीच्या पद्धतीने राज्याच्या राजकारणामध्ये घटना घडत आहेत. या घटना जनतेला मान्य नाही. मला स्वतःला देखील या घटनेचा तिरस्कार होतो आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील जनतेला याविषयी निश्चित भूमिका घेऊन चुकीच्या घटकांना योग्य जागा दाखवली गेली पाहिजे असे त्यांनी सांगितले
जो गरजेल तो बरसेल काय ? अशी उपहासातत्मक विधान परिषदेच्या उपसभापती गोरे यांनी करताना दररोज वृत्तवाहिन्यावरून महाराष्ट्राला दिसते आहे. ते नको आहे. त्याच्या ऐवजी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी लोकहिताचे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काय केले हे दाखवले गेले पाहिजे. त्याची महाराष्ट्राला गरज आहे. याप्रसंगी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची जी दुरावस्था होते त्याविषयी सरकारने कालबद्ध कार्यक्रम देऊन त्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी संस्थेमार्फत जे सर्वेक्षण केले आहे. त्यातून उपाययोजना दिलेले आहेत. त्याच्याविषयी राज्य सरकारने निश्चित भूमिका घेतली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उपनेत्या ज्योतीताई ठाकरे,झेलम जोशी,सम्पर्क प्रमुख अनिल खोचरे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई पवार (वडणे),सोलापूर महिला जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड,सुखताई लटपटे,परभणी महिल जिल्हाप्रमुख .सांगली , जिल्हाप्रमुख सुनिताताई मोरे, सुरेखाताई मुळे,शितलताई देवरूखकर,दिपाताई पाटील,शाम पवार,सुधीर कदम, सुनील जाधव,सागर इंगळे,चेतन बंडगर,बालाजी पांचाळ,सिद्राम कारभारी ,तानाजी जाधव, सतीश महामुनी, उपस्थित होते.