उस्मानाबाद, दि.३० :राजगुरु साखरे :

 उस्मानाबाद येथील डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयातील सन २०२१-२२ तृतीय वर्षातील विद्यार्थ्याकडून नवरात्र महोत्सवामध्ये तुळजापुरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी सामाजिक बांधिलकी जपत दि,२९ रोजी शेकापूर रोड  शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय उस्मानाबाद येथे  शाबु खिचडी,केळी,फिरळ चिवडा, पिण्याची पाणी आदी फराळाच्या पदार्थाचे  वाटप करण्यात आले. 


या कार्यक्रमास विधी महाविद्यालयाचे डॉ. संजय आंबेकर, प्रा.शहा  यांनी सदिच्छा भेट दिली . यावेळी या कार्यक्रमास अतुल लगदिवे,  श्रीकृष्ण बाबरे, महावीर लोमटे, गणेश थोरात, रवींद्र कांबळे ,प्रवीण भालेराव डॉ. श्रीकृष्ण उंदरे - देशमुख, सचिन इंगळे, प्रशांत खोचरे आदी विद्यार्थी उपस्थित होते.
 
Top