तुळजापूर दि.३०

 तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथे "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" या अभियानाअंतर्गत 150 महिलांची तपासणी करण्यात आली. यावेळी तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.


शासनाच्या वतीने माता सुरक्षित असेल तर घर सुरक्षित राहू शकते, अशी संकल्पना राबविणारे माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान चालविण्यात येत आहे. तालुक्यातील बसवंतवाडी येथे या योजनेअंतर्गत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये महिलांचे आरोग्य ज्यामध्ये शुगर, बीपी, एचबी, वजन आणि उंची इत्यादींची तपासणी करण्यात आली.


 या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी भ्रष्टाचार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते नेताजी शिंदे ,संत गाडगेबाबा स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष तानाजी जाधव, क्षीरसागर  लतिका, नेताजी शिंदे, आशा कार्यकर्ती उज्वला बनसोडे ,केदारनाथ ताटे यांची उपस्थिती होती. या शिबिरासाठी बसवंतवाडी येथील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top