तुळजापूर, दि.२९ :

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या खासदार  सुप्रियाताई सुळे यांनी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या  चौथा माळी दिवशी श्री तुळजाभवानी मातेचे  दर्शन घेतले. 

यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भवानी मातेचे दर्शनानंतर मिळालेली ऊर्जा उपेक्षित गोरगरीब समाजाच्या उन्नतीसाठी आपण उपयोगात आणू असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचं तुळजापूर येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी  तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले.   तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतिने त्यांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गोकुळ  शिंदे व परिवहन एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवन गोरे,  तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, नळदुर्गचे  माजी नगराध्यक्ष  शफी शेख,  जिल्हा सचिव विजय सरडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका संघटक व प्रसिद्ध प्रमुख बबन गावडे,  खंडोजी जाधव, शहराध्यक्ष अमर  चोपदार,  गोरख पवार, दिलीप  मगर यांनी  पुष्पहार घालून तुळजापूर नगरीमध्ये त्यांचे स्वागत केले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या निमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तुळजाभवानी मंदिरात उपस्थित होते.

उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष सुरेश  बिराजदार,  माजी आमदार  राहुल मोटे,  मराठवाडा विभागीय अध्यक्षा सौ.वैशाली मोटे, युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर,  प्रदेश उपाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, नंदकुमार गवारे,  युवक तालुका अध्यक्ष संदीप गंगणे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, शहराध्यक्ष नितीन रोचकरी, जन मंगल ग्रुप अध्यक्ष बाळासाहेब चिखलकर , विद्यार्थी  जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंखे ,रोहित चव्हाण, समर्थ पैलवान  शशी नवले,  ,राजाभाऊ शिंदे ,राजाभाऊ गायकवाड, तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर  गंगणे, आप्पासाहेब पवार यांच्यासह तुळजापूर येथील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. 

  विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गोकुळ शिंदे यांनी केंद्रीय पर्यटन स्थळाच्या यादीत तुळजापूरचा समावेश करण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन दिले .


 खासदार सुप्रिया सुळे यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी मंदिरामध्ये या दौऱ्यामध्ये दिसून आली
 
Top