काटी, दि. ०५

तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथे असलेल्या भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या एकलव्य विद्यासंकुल मधील चारशे विद्यार्थ्यांना पुणे युनियनच्या बॅंक ऑफ महाराष्ट्र मधील सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ' बँक ऑफ महाराष्ट्र माजी कर्मचारी एम्प्लॉइज पुणे ' यांच्या  वतीने युनियन च्या सदस्यांना पंच्च्याहत्तर वर्षे पूर्ण झालेच्या निमित्ताने त्यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात गणवेश  प्रदान करण्यात आले. 


हा सत्कार सोहळा सोलापूर येथील सारस्वत मंगल कार्यालयात घेणेत आला होता. या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे आणि आनंद काळे यांचेकडे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बॅंक ऑफ महाराष्ट्र पुणे युनियनचे अध्यक्ष चौधरी, बँक ऑफ महाराष्ट्र सोलापूर रिजन चे सोलापूर विभागाचे जिडगे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.एकलव्य विद्यालयात भटके विमुक्त समाजातील वेगवेगळ्या जाती उपजातीतील मुलांना शिक्षण दिले जाते. बॅंक ऑफ महाराष्ट्र सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
      
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, आनंद काळे, चावरे यांच्यासह युनियनचे सदस्य उपस्थित होते.
 
Top