तुळजापूर दि .०३

नगरपरिषद शाळा क्रमांक तीनच्या शिक्षकांनी केलेले कष्ट आणि त्यांना नगरपरिषदेकडून मिळालेले सहकार्य यामुळे या शाळेने मराठवाड्यामध्ये उत्तम आणि दर्जेदार शिक्षणाची परंपरा कायम ठेवली आहे तुळजापूर नगरपालिकेचा हा पॅटर्न निश्चित महाराष्ट्राला कौतुकास्पद आणि मार्गदर्शक असल्याचे गाव रोजगार प्रसिद्ध समाजसेवक भास्कर पेरे पाटील यांनी सांगितले. 

महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक आदर्श गाव संकल्पनेची संकल्प भास्कर पेरे पाटील यांनी तुळजापूर येथील नगरपरिषद शाळा क्रमांक तीनला भेट दिली आणि येथील आदर्श शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले. 


याप्रसंगी या प्रभागाचे नगरसेवक पंडित जगदाळे आणि नगरसेविका सौ मंजुषाताई देशमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.  मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी येथील सर्व शैक्षणिक उपक्रमाची माहिती भास्करराव पेरे पाटील यांना दिली. प्रत्यक्ष शैक्षणिक कामाची पाहणी त्यांनी करून नगरपरिषदेच्या या प्रशालेने शिक्षण क्षेत्रामध्ये केलेली कामगिरी आणि वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी केलेले प्रयत्न सर्व इतर नगरपरिषद आणि सरकारी शाळेसाठी मार्गदर्शक आहेत. अशा शब्दात त्यांनी नगरपरिषद शाळा क्रमांक तीनच्या कामाचे कौतुक केले. याप्रसंगी भास्करराव पेरे पाटील यांचा सत्कार स्थानिक नगरसेवक पंडितराव जगदाळे व सौ मंजुषाताई देशमाने यांच्या हस्ते करण्यात आला.
 
Top