तुळजापूर ,दि.०३ 

सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा जिनत कोहिनुर सय्यद यांचा राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार घोषित झाल्याबद्दल स्वगृही पदाधिकारी यांनी सत्कार गौरव केला.

भूम तालुक्यातील बेलगाव पिंपळगावच्या लोकनियुक्त सरपंच तथा सरपंच  परिषद पुणे महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा जिनत कोहिनुर सय्यद याच्या कार्याची दखल घेत पुणे येथील रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणाऱ्या राज्यस्तरीय नवदुर्गा 2022 साठी उस्मानाबाद जिल्यातुन एकमेव महिला निवड करण्यात आली असून हा पुरस्कार  घोषित झाल्याबद्दल स्वगृही त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रवीण रणबागुल, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुजित हंगरेकर,जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब जेवे,जिल्हा उपाध्यक्ष किरण व्हरकट, तुळजापूर तालुकाध्यक्ष संजय गुंजोटे,काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष विलास शाळू,भूम तालुका अध्यक्ष रुपेश शेंडगे, सेवादल काँग्रेस प्रदेश सचिव शशिराज माने, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर डोंबाळे, सरपंच परिषद प्रदेश संघटक कोहिनूर सय्यद, विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस दत्ता तांबे,सरपंच परिषद जिल्हा संघटक बालाजी कुटे,नळीवडगाव उपसरपंच बिबीशन वाघमोडे, जिल्हा प्रसिद्धी विभाग अतीक शेख,राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल आगलावे आदींची उपस्थिती होती.
 
Top