वागदरी , दि. ०६: एस.के.गायकवाड:
अशोक विजया दशमीदीनी तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येते ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पंचशील बुद्ध विहार कमिटी वागदरीच्या वतीने येथील पंचशील बुद्ध विहाराच्या प्रागंणात पंचशील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी उपसरपंच मुक्ताबाई कुंडलीक वाघमारे, ग्रा.प.सदस्य रावसाहेब वाघमारे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे ध्वज कट्ट्याचे पूजन करून पंचशील ध्वजारोहण करून सामुदायिकरित्या बुद्ध वंदना घेण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन रिपाइंचे उस्मानाबाद जिल्हा सचिव एस.के.गायकवाड यांनी केले. यावेळी जेष्ठ कार्यकर्ते उत्तम झेंडारे,कुंडलीक वाघमारे,अनिल वाघमारे,चंद्रकांत वाघमारे,भिमशाहीर शिवाजी वाघमारे, महादेव वाघमारे, महिला कार्यकर्त्या उज्वला वाघमारे,राधाबाई वाघमारे,कोमल झेंडारे,कविता संदिपान वाघमारे,पार्वती वाघमारे, कमलबाई कांबळे सह कार्यकर्ते उपस्थित होते.