मंगरूळ ,दि. ०९

तुळजापूर तालुक्यातील  वात्सल्य सामाजिक संस्थेच्या सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल घेऊन प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.सुहासिनी शहा व प्रिसिजन उद्योग समूहाचे चेअरमन श्री.यतीन  शहा यांनी सोलापूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्व. सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार जाहीर केला.

प्रिसिजन ही सोलापूर स्थित नावाजलेली आंतरराष्ट्रीय कॅमशाफट्स उत्पादक कंपनी आहे.प्रिसिजन फाऊंडेशनच्या माध्यमातून समाज क्षेत्रातील विविध विषयात कार्य चालते.2009 पासून सातत्याने दरवर्षी तीन दिवसीय प्रिसिजन गप्पा कार्यक्रम असतो.सोलापूरच्या सांस्कृतिक आणि सामाजिक विकासात प्रिसिजन चे मोठे काम आहे.

या तीन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमात पहिल्या दिवशी समाजामध्ये निरपेक्षपणे कार्य करणाऱ्या संस्थांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.यासाठी प्रिसिजन कोणाकडून ही अर्ज मागवत नाही.प्रिसिजनची स्वतंत्र टीम याचा अभ्यास करून संस्थांची नावे जाहीर करते.

वात्सल्य सामाजिक संस्था ही वंचित-उपेक्षित घटकांसाठी काम करते. या संस्थेचा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे एकल महिलांसाठी “आत्मनिर्भरता”.खेड्यापाड्यात अनेक महिला एकटेपणाचा आयुष्य जगत असतात, कुटुंबाने नाकारलेल्या,विधवा,अपंग,नाईलाजास्तव एकटे राहणाऱ्या महिलांची अत्यंत वाईट अवस्था असते अशा महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी तसेच ताईसाठी एक साडी, जीवनावश्यक वस्तू व औषधांचे मोफत वाटप,गोशाळा,मालती-माधव स्मृती ग्रंथालय,रुग्णवाहिका,वृक्ष लागवड व संवर्धन, सेंद्रिय शेती,पर्यावरण अशा विषयात ही संस्था काम करते.

प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते व श्रीमती सुहासिनी शहा श्री. यतीन शहा श्री.करण शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत वात्सल्य संस्थेस हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

दोन लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.सोलापूर येथील रंगभवन सभागृहात दि.14 ऑक्टोंबर रोजी सदरील कार्यक्रम संपन्न होणार आहे.या पूरस्कारामुळे वात्सल्य संस्थेचे अभिनंदन होत आहे.

प्रिसिजनचा पुरस्कार मिळणे ही संस्थेच्या दृष्टीने नक्कीच बहुमानाची गोष्ट आहे.पुरस्कार मिळाल्याने काम करण्याची प्रेरणा मिळते.आता वात्सल्यची टीम अधिक जोमाने सामाजिक क्षेत्रात काम करेल.
प्रमिला जाधव 
उपाध्यक्षा
वात्सल्य सामाजिक संस्था
 
Top