नळदुर्ग,दि.०८

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांचे हस्ते जळकोट ता. तुळजापूर येथील ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे उद्‌घाटन व लोकार्पण करण्यात आले .
   

 दि ७ ऑक्टोबर रोजी मनसे नेते अमित ठाकरे यांनी जळकोट गावास भेट दिली असता, ग्रा पं . सदस्य तथा मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी त्यांना ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांबाबत माहिती दिली. ठाकरे यांनी झालेल्या विकास कामांबाबत समाधान व्यक्त करून या कामांचे उद्‌घाटन आणि लोकार्पण केले .
    
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळकोट गावचे सरपंच आशोक पाटील तर जि . प . सदस्य प्रकाश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती . मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी मनसे नेते दिलीप  धोत्रे, जिल्हासंघटक अमरराजे कदम, उपजिल्हाध्यक्ष महेश जाधव यांचेसह जळकोट ग्रामस्थ  उपस्थित होते . 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी अजय डांबरे, सागर पवार, धनंजय मडोळे, आकाश पटणे यांनी परिश्रम घेतले .
 
Top