उमरगा , दि. ०७: लक्ष्मण पवार

 श्री  तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांसाठी उमरगा येथील तुळजाभवानी मित्र मंडळाच्यावतीने शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बसस्थानकासमोरील जालू  टी हाऊसच्या समोर शुक्रवारी मोफत अन्नछत्र चहा, दुध व बिस्किटे वाटप सुरू करण्यात आले. 


या अन्नछत्राचे उद्घाटन भारत विद्यालयाचे संजय देशमुख गुरूजी यांच्या हस्ते करण्यात आले. तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी हजारो भाविक पायी जात असतात. आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्याची सीमा संपल्यानंतर महाराष्ट्र राज्याची सीमा सुरू होते. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आंध्र व कर्नाटकातील हजारो भाविक या मार्गावरून दरवर्षी पायी जातात. पायी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी शहरातील तुळजाभवानी मित्र मंडळाच्यावतीने गेल्या 15  वर्षापासून मोफत अन्नछत्र सुरू करण्यात येते. अन्नछत्रात फराळा बरोबरच दुध, चहा व बिस्किटाची उत्तम सोय मंडळाच्यावतीने केली जाते. नवरात्र उत्सव काळात  भाविक येथील अन्नछत्राचा लाभ घेतात. 


शुक्रवारी सुरू करण्यात आलेल्या अन्नछत्र कार्यक्रमाप्रसंगी जालिंदर सोनटक्के, लक्ष्मण पवार,सतिश जगताप,मल्लीनाथ वागदरे,  नागेश सोमवंशी, विनोद मुगळे, भास्कर मुळे, दत्ता परीट, पोपटराव सोमवंशी, अशोक सुर्यवंशी, धनराज घोडके आदींची उपस्थिती होती.
 
Top