तुळजापूर ,दि. ०९
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालयास नॅक मूल्यांकनामध्ये "अ" मानांकन प्राप्त झाले. या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापुरचे माजी सहसचिव प्रशासन डॉ.रमेश दापके यांच्या वतीने प्राचार्य डॉ एस एम मणेर , मेजर डॉ वाय ए डोके व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले,
तसेच यावेळी बोलताना डॉ रमेश दापके म्हणाले की, तुळजाभवानी महाविद्यालयाची एक वेगळी ओळख आहे,अभिनय क्षेत्रातील कामगिरी साठी पुरुषोत्तम करंडक पूर्वी प्राप्त केलेले हे एकमेव महाविद्यालय होय,याच महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडुन सांस्कृतीक विभागाच्या माध्यमातून सर्वप्रथम फिरता रंगमंच तयार करण्यात आला होता, तसेच प्राचार्य डॉ मणेर म्हणाले की, महाविद्यालयाचे हे यश एकतेचे आहे,आजी माजी विद्यार्थी, महाविद्यालयीन विकास समिती, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हे यश महाविद्यालयास प्राप्त झाले असून यापुढे प्राप्त मानांकनापेक्षाही अधिक चांगले मानांकन मिळवण्यासाठी सर्वांनी शर्थीचे प्रयत्न करणे आवश्यक आसल्याचे सूतोवाच त्यांनी यावेळी केले.
सदर प्रसंगी बिल गेट्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रिझवी तसेच महाविद्यालयीन सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते, कार्यक्रमाचे आभार प्रा आशपाक आतार यांनी मानले