तुळजापूर, दि. १२
उपजिल्हा रुग्णालय तुळजापूरच्या वतीने नवरात्र काळात सेवा देणाऱ्या 108 रुग्णवाहिका चालक व डॉक्टर यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
शादीय नवरात्र उत्सव 2022 मध्ये तुळजापूर शहर व मंदिर परिसरात 18 प्रथम उपचार केंद्रामार्फत एकूण 56 हजार 985 रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय व शासकीय आरोग्य यंत्रणा मार्फत सेवा देण्यात आली ,उपजिल्हा रुग्णालय मार्फत 108 च्या 13 रुग्णवाहिका च्या सर्व डॉक्टर व चालकांना रुग्णसेवेसाठी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, यावेळी रुग्णालय अधीक्षक डॉ.हनुमंत होनमाने ,रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले ,डॉ.श्रीधर जाधव, डॉ. अक्षय पाटील,108 रुग्णवाहिका नियंत्रक अमित मालवदकर ,जयराम शिंदे,रुग्णालय सर्व डॉक्टर ,सिस्टर व कर्मचारी उपस्थित होते.