मुरुम दि. ६
यशवंत नगर मुरूम ता.उमरगा येथे नवरात्र निमित्त दांडीया व महिलाच्या स्पर्धा उत्साहात संपन्न झाले. स्त्री शक्तीचा जागर व आदि शक्तीचा जयघोष हा अतिशय हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला .
कोरोना सारख्या महामारीतून जणू आपण अस्तित्वाचीच लढाई जिंकून श्वास घेतोय . सर्वच महिलांना तर अनेक समस्यां ना तोंड द्यावे लागले . कोरोनाने सर्व जग ठप्प पडले होते पण महिला मात्र असंख्य हातांनी अनेक भूमिका अहोरात्र पार पाडत होती . गृहिणी असेल तर घरातील सर्वांना सांभाळताना तिला मानसिक व शारीरीक दोन्ही ताण पडले व नौकरी व्यवसाय करणारी असेल तर तिला वर्क फ्राम होम व घरचे काम हे सांभाळता सांभाळता नाकीनऊ येत होते .
म्हणूनच कोरोनानंतर सर्व सुरळीत सुरु होत असताना आनंदाचे चार क्षण मिळावे यासाठी यशवंत नगर मुरुम येथे चार चोघी च्या संकल्पनेतून दांडीया घेण्याचे ठरवले व या आयोजानाला महिलांनीही भरभरून प्रतिसाद दिला . या कार्यक्रमा अंतर्गत महिलांची संगीत खूर्ची , उखाने ,नृत्य , गायन असे उपक्रम घेण्यात आले . वय विसरत संगीताच्या तालावर महिला नी दांडीयाचा ताल धरला . अतिशय सुंदर आणि मनाला पून्हा एकदा उभारी देणारा असा कार्यक्रम ठरला .
या कार्यक्रमासाठी सौ . इंगोले , सौ नायकल , सौ . राठोड , सौ . देशमाने, सौ . धर्माधिकारी सौ . आष्टगी - मठकरी आदिनी महिलांनी परिश्रम घेतले . दसऱ्या दिवशी या दांडीया महोत्सवात घेतलेल्या स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण हि करण्यात आले . स्वखर्चाने स्वबळावर महिलांनी महिलांसाठी घेतलेला हा कार्यक्रम आनंदाची पर्वणीच ठरला .