काटी,दि.०६ उमाजी गायकवाड 


गेले नऊ दिवस विविध व्रतवैकल्ये करून आदिशक्ती मातेची मंगलमय वातावरणात आराधना केल्यानंतर बुधवारी विजयादशमीदिनी तुळजापूर  तालुक्यातील काटी येथील  महात्मा फुले मंडळाच्या देवीची सवाद्य मिरवणुकीने नवरात्र महोत्सवाची सांगता झाली.
       

 काटी  येथील महात्मा फुले  नवरात्रोत्सव  मंडळाच्या वतीने गेली 41 वर्षे मोठ्या उत्साहाने नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. काटी येथील  हा उत्सव आदिशक्तीचा-स्त्रीशक्तीचा मानला जातो व नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून   महात्मा फुले  नवरात्र महोत्सवाच्या वतीने  दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून संस्कृती संवर्धनाचे कार्य करण्यात  येत आहे.             
     

यंदा दोन वर्षांच्या कोरोनाच्या कालखंडानंतर निर्बंधमुक्त वातावरणात नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला. यंदा घटस्थापने दिवशी वाजत गाजत देवीची मिरवणूक काढून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विद्यासागर ढगे, संस्थापक सचिव निवृत्ती भोजने, उत्सव समितीचे अध्यक्ष बालाजी ढगे, उपाध्यक्ष काशिनाथ काळे, तात्यासाहेब चवळे,बाळासाहेब भाले, सचिन भोजने, तानाजी हजारे,आदी मान्यवरांच्या हस्ते देवीमुर्तीची पुजा करुन  प्रतिष्ठापना करण्यात आली .  मंडळाच्या वतीने नवरात्र  कालावधीत  मूर्तीस विलोभनीय आणि आलंकारिक पोशाख घातले होते.देवीला दररोज विविध रंगाच्या साड्या परिधान करण्यात  आल्या  होत्या. 


घटस्थापनेपासून रोज विविध  धार्मिक  कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये  प्रामुख्याने दररोज  सायंकाळी  आराधी मंडळाचा देवीच्या  गाण्याचा कार्यक्रम चैतन्यमय वातावरणात घेण्यात आला होता हा धार्मिक कार्यक्रम  पहाण्यासाठी देवीभक्तांनी अलोट  गर्दी केली होती. बुधवार दि.5  रोजी सायंकाळी सहा वाजता मंडळाचे सदस्य प्रभाकर चवळे यांच्या हस्ते देवीच्या मुर्तीचे पुजन करुन  देवीच्या नगरप्रदक्षिणेच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. 


या भव्य मिरवणूकीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात गोंधळी गिते, जनजागृती गिते, देवींचे गीते, लहान मुलींच्या कलाविष्काराने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. यामध्ये प्रामुख्याने कु‌.दुर्वा श्रीकांत भोजने या छोट्याशा चिमुकलीने  "दिसला गं बाई दिसला...मला बघून गालात हसला" या गाण्यावरील नृत्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. तर अंबा जेवत नाही....., दार उघड बया दार..., अंबा कोण भरील झोळी गीतावरील अंकुश वाघमोडे, राजु माळी, संतोष काळे यांनी सादर केलेल्या गीतांवर  व नृत्यावर देवीभक्त मंत्रमुग्ध  झाले होते. तसेच  मंडळातील सदस्यांनी विविध गीतांवर सादर केलेल्या लेझीम पथकातील कवायतीच्या ठेकावर   देवीभक्तांनी ठेका धरला होता. चौकाचौकात  सांस्कृतिक कार्यक्रम  घेत मंडळाची भव्य मिरवणुक  काढण्यात आली होती. हि विलोभनीय  मिरवणूक  पहाण्यासाठी  देवीभक्तांनी  दुतर्फा  अलोट  गर्दी केली होती.         

महात्मा फुले  नवरात्र  उत्सव  मंडळाची 1982 ला सुरुवात झाली  असून  मागील 41 वर्षापासून  विविध  धार्मिक कार्यक्रम  राबवित हि परंपरा  अखंडित सुरू आहे. हा नवरात्रोत्सव  यशस्वी  करण्यासाठी  मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विद्यासागर ढगे, संस्थापक सचिव निवृत्ती भोजने यांच्यासह  नवरात्रोत्सव  मंडळाचे  अध्यक्ष  बालाजी ढगे,उपाध्यक्ष काशिनाथ काळे, तात्यासाहेब चवळे, तानाजी हजारे, बाळासाहेब भाले,बालाजी ढगे, रामेश्वर लाडुळकर,अनिल ढगे,बळी चवळे, सचिन भोजने,प्रभाकर चवळे,सतिश भाले, संतोष काळे, विष्णू  ढगे, सचिन काळे, दादा गाढवे, शिवलिंग घाणे,सुहास  कुलकर्णी,अंकुश  वाघमोडे,पोपट हागरे, शहाजी काळे,अशोक हेडे,ज्योतिराम चवळे, राजाभाऊ माळी,नरसिंह काळे, अमोल पोतदार, संजय साळुंके, विनायक ढगे,श्रीकांत भोजने, बाळासाहेब  कुलकर्णी,शशिकांत भोजने, गोविंद हजारे, विष्णू ढगे, महेश ढगे, विशाल ढगे, हणमंत हागरे, गोवर्धन बनसोडे, विनायक बनसोडे, बालाजी भोजने, नवनाथ सुरडकर, सादिक तांबोळी आदींसह मंडळातील  सभासदांनी परिश्रम घेतले.
 
Top