काटी,दि.०६
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील मावळे नवरात्रोत्सव तरुण मंडळ आयोजित कोरोनाच्या निर्बंधानंतर नवरात्रोत्सवानिमित्त प्रथमच सांस्कृतिक कार्यक्रमात घेण्यात आला. गावातील विविध स्पर्धकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला होता.
यामध्ये विविध एकल व समुहनृत्य सादर करण्यात आले होते. या कार्यक्रमात कु.श्रेया सुनिल परिट या चिमुरडीने दे धक्का या चित्रपटातील
अडवू नका मज सोडा आता
पुरं झालं ना धनी
उगवली शुक्राची चांदणी......या गीतावर केलेल्या बहारदार नृत्याने काटीतील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. या स्पर्धेत तिने तिसरा क्रमांक पटकावित तिचा मावळे नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने सन्मानपत्र, चषक देऊन गौरव केला.
या कार्यक्रमात अनेक चिमुरड्या बालकलाकारांनी एकापेक्षा एक सदा गीतावर नृत्य सादर करुन कार्यक्रमात रोमांच निर्माण केला होता.