तुळजापूर,दि.२०: उमाजी गायकवाड
मराठा समाजातील युवकांच्या सामाजिक आणि आर्थिक उत्थानासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कै. अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष
नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची फेरनिवड झाली. त्यानंतर त्यांनी प्रथमच तुळजापूर येथे येऊन शनिवार दि.19 रोजी आई तुळजाभवानीची महापुजा करुन दर्शन घेतले.
यावेळी आई तुळजाभवानीच्या आशिर्वादाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होत असून स्व.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कार्य विस्तारुन त्या माध्यमातून मराठा समाज आर्थिकदृष्ट्या प्रगत करणे हे स्वप्न मनात ठेवून राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन त्यांची सेवा घडावी अशी इच्छा प्रकट केली.
यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अनंत जाधव,राम जाधव, पुजारी विकास मलबा, भाजपचे जिल्हा चिटणीस सुहास साळुंके,तालुका सरचिटणीस शिवाजी बोधले, अविनाश गंगणे, माजी नगरसेवक तुळजापूर राजशेखर गुड्डू कदम, युवा शहराध्यक्ष सागर पारडे, युवा तालुका सरचिटणीस अर्जुन आप्पा साळुंके, सचिन गडदे, इरशाद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.