नळदुर्ग, दि.२० 

नळदुर्ग येथिल श्री  क्षेत्र  रामतीर्थ येथे राज्य पोलिस प्राधिकरणचे सदस्य उमाकांत मिटकर, रामतीर्थ देवस्थानचे महंत  विष्णूप्रसाद शर्मा महाराज आदी मान्यवरांच्या हस्ते हनुमान चालीसा पाठ पुस्तिकाचे प्रकाशन करण्यात आले.

 

रामतीर्थ येथील पुरातन राम मंदिरात शनिवारी .  रोजी सकाळी ९ वाजता  हनुमान चालीसा पठन, हनुमान चालिसावर आधारीत धार्मिक  पुस्तक प्रकाशन, महाआरती व  महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणच्या अशासकीय सदस्यपदी दुस-यादा निवड झाल्याबद्दल उमाकांत मिटकर यांचा सत्कार करण्यात आला.


 यावेळी राममंदिर येथीला विष्णूप्रसाद शर्मा महाराज, बलभीमराव मुळे , उमाकांत मिटकर, श्रमिक पोतदार, सचिन डुकरे, प्रभाकर घोडके, विलास येडगे, मनीष हजारे यांच्यासह रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top