नळदुर्ग ,दि.१९ :
महाराष्ट्र पुरातत्व विभाग व नळदुर्ग भुईकोट किल्ला जतन व संगोपनाकरिता घेतलेल्या युनिटी मल्टीकॉन्स प्रा.लि. कंपनीच्या वतीने शनिवार दि.19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत जागतिक वारसा सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
या निमित्ताने शनिवारी ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यात स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली. यावेळी युनिटी कंपनीचे व्यवस्थापक जुबेर काझी, विनायक अहंकारी, हाजी शेख, किल्लेदार नागनाथ गवळी
व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी सहा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.