काटी, दि. ३१: उमाजी गायकवाड

श्री श्री रवीशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे देशभरात लाखों लोकांना ‘हॅपिनेस प्रोग्राम’ द्वारे आनंदी, उत्साही आणि तणाव मुक्त जीवनाची रहस्ये शिकवण्यासाठी विविध ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. 

तब्बल 10 वर्षांनी जगभरात शांतता दूत म्हणून ओळखले जाणारे प.पू. गुरुदेव श्री.श्री.रविशंकरजी 2 फेब्रुवारी रोजी तब्बल 10 वर्षांच्या प्रदिर्घ कालखंडानंतर तुळजापूर नगरीत येत आहेत. त्याअनुषंगाने आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील काटी येथे 3 जानेवारी ते 8 जानेवारी या कालावधीत ‘हॅपिनेस प्रोग्राम’ या आनंदलहरी
शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


काटी येथे घेण्यात येणाऱ्या ‘हॅपिनेस प्रोग्राम’चा मुख्य भाग म्हणजे गुरुदेवांना प्राप्त झालेली सुदर्शन क्रिया ही अतिशय प्रभावी अशी तालबद्ध श्वसन प्रक्रिया आहे. या विशेष श्वसन प्रक्रियेमुळे मानसिक ताण,थकवा निघून जातो. क्रोध, नैराश्य व उदासीनता यासारख्या नकारात्मक भावना नाहीशा होतात. शांत, उत्साही वाटते आणि एकाग्रता वाढते. या शिबिराच्या माध्यमातून सहभागी  शिबिरार्थी आनंदी होण्याचे मार्ग शिकणार आहेत. त्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे खास प्रशिक्षित शिक्षक व स्वयंसेवक या शिबिरासाठी मार्गदर्शन करणार आहेत. 

काटीसह परिसरातील नागरिकांनी ‘हॅपिनेस प्रोग्राम’ या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगचे डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कमिटीचे सदस्य अमरसिंह देशमुख यांनी केले आहे. 

काटीमधील शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचे उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कमिटीचे सदस्य अमरसिंह देशमुख व आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक संतोष सावंत यांच्याशी संपर्क साधावा.

या शिबिरात सहभाग घेण्यासाठी खालील क्रमांकावर नोंदणी करावी.
 
संपर्क क्रमांक-
1)अमरसिंह देशमुख मो.नं.9422070604,
9527391095
2) संतोष सावंत बीड, 
मो.नं. 7776991111
या क्रमांकावर संपर्क करावा.
 
Top