काटी, दि. ०४ : उमाजी गायकवाड

आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते प.पू. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे बेंगलोर आश्रमातील शिष्य ऋषी देवव्रत यांचे काटीत जंगी स्वागत करण्यात आले.अमरसिंह देशमुख ते निलकंटेश्वर मंदीरा पर्यंत पदयात्रा निघाली.  ठिकठिकाणी दारात महिलांनी रांगोळी काढून आरती करीत  गुरुदेवांचे स्वागत करीत आशिर्वाद घेतले. 



तत्पूर्वी आर्ट ऑफ लिव्हिंगचे उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कमिटीचे सदस्य अमरसिंह देशमुख यांच्या निवासस्थानी ऋषी देवव्रत यांच्या हस्ते गुरुपूजा व ध्यान साधना झाली.यावेळी मार्गदर्शन करताना ऋषी देवव्रत म्हणाले की,आर्ट ऑफ लिविंगची स्थापना गुरुदेव श्री श्री रविशंकर हे भारताच्या कर्नाटक राज्यातील शिमोगा इथे असताना दहा दिवसांच्या मौनावस्थेत असताना त्यांना ' सुदर्शन क्रिया ', एक शक्तिशाली श्वसन प्रक्रिया प्राप्त झाली. तणाव निर्मुलनासाठी आणि निरोगी राहण्यासाठी लागणारी प्रभावी प्रक्रिया कालांतराने सुदर्शन क्रिया ही आर्ट ऑफ लिविंगच्या शिबिरांचे मुख्य गुण वैशिष्ट्य बनल्याचे सांगून केवळ एकाच प्रकारच्या जनसमुदायाला आवाहन न करता हे कार्यक्रम जगभरात आणि समाजाच्या सर्व पातळ्यांवर उपयुक्त ठरल्याचे त्यांनी सांगितले. 


पुढे महाराष्ट्र भूमी संदर्भात बोलताना ते म्हणाले की, शिवरायांसारखा प्रेरणादायी आदर्श राजा, संत आणि ग्रंथांचे संस्कार,महाराष्ट्र भूमीतील प्रेरणादायी व्यक्तीमत्व शिवरारायांसारखे शुरवीर महाराष्ट्रात जन्मले. अन्य कोणत्याही राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सर्वाधिक संत होऊन गेले.ज्यांचा विचारांचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला. एकीकडे शुरविरांनी इतिहास घडवला तर अध्यात्मातून समाज घडविण्याचे काम महाराष्ट्रातील महान संतांनी केले. त्यामुळे एक पावन भूमी म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जात असल्याचे देशमुख यांच्या निवासस्थानी झालेल्या गुरुपूजा व ध्यान साधना वेळी भाविकांना उद्देशून त्यांनी आवर्जून सांगितले.

आनंद अनुभूती शिबिरात दुसऱ्या दिवशी सुदर्शन क्रियांचे धडे


तुळजापूर तालुक्यातील काटी येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आनंद अनुभूती शिबिरामध्ये दुसऱ्या दिवशी सुदर्शन क्रिया कशी करावी याविषयी बुधवारी सकाळी 6 ते 8:30 या कालावधीत प्रशिक्षणार्थींना श्री श्री रविशंकर यानी मार्गदर्शन केलेल्या ऑडीओ कॅसेटच्या सहाय्याने प्रशिक्षित प्रशिक्षक संतोष सावंत,बीड, भास्कर  मगर सेलू जि.परभणी यांनी अतिशय सुरेख पद्धतीने मार्गदर्शन केले. 

वसंत हेडे यांच्या निवासस्थानी गुरुपूजा

वसंत हेडे   यांच्या निवासस्थानी प.पू. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे बेंगलोर आश्रमातील शिष्य ऋषी देवव्रत यांच्या हस्ते गुरुपुजा व ध्यान साधना झाली. यावेळी सौ. सुवर्णा हेडे व वसंत हेडे या पतीपत्नींनी त्यांचे स्वागत करुन आशिर्वाद घेतले.यावेळी गुरुदेव ऋषी देवव्रत यांनी आनंद अनुभूती शिबिरात आलेले अनुभव व  सुदर्शन क्रियेविषयी उपस्थित प्रशिक्षणार्थींना विचारलेल्या प्रश्नांसंदर्भात प्रशिक्षणार्थी प्रदीप साळुंके यांनी 
या सुदर्शन क्रियेत तणाव आणि अशांत लोकांना मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनविण्यासाठी ही प्रक्रिया महत्वपूर्ण असल्याचे सांगितले.

यावेळी उद्योजक अमरसिंह देशमुख, प्रशिक्षक संतोष सावंत, भास्कर मगर, प्रदीप साळुंके, नानासाहेब देशमुख,पत्रकार उमाजी गायकवाड,वसंत हेडे, सौ.सुवर्णा वसंत हेडे,अतुल सराफ बाळासाहेब मासाळ, अजय देशमुख, सचिन इंगळे,सुहास (पिंटू) कुलकर्णी, जामुवंत म्हेत्रे, सिध्दु म्हेत्रे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top