तुळजापूर,दि.०५ :
आध्यत्मिक गुरू गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या तुळजापूर येथे दि.२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आगमनाप्रित्यर्थ मागील १० दिवसापासून चालू असलेल्या सेवेला काटी ता. तुळजापूर येथिल व परिसरातील गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद देत हॅपिनेस प्रोग्राम ला ४० पेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवला. यात महिला,पुरुष,तरुण सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे उत्साहाने नवीन वर्षाचे आगमन शिबिरातील प्रतिसाद नोंदवून दाखवून दिला.
उद्योजक अमरसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शन , पत्रकार उमाजी गायकवाड,वसंत हेडे ,पंकज काटकर आदिसह सर्वांनी खूप चांगली सेवा केली.प्रशिक्षक म्हणून भास्कर मगर आणि प्रा.संतोष सावंत यांनी शिबिरासाठी पुढाकार घेतले.