अणदुर ,दि.०५
तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथील पत्रकार नागेश कर्पे यांची शिवा संघटना मीडिया सेलच्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .
नागेश करपे हे गेल्या अनेक वर्षापासून प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियात काम करीत आहे . त्यांच्या कामाची वीरशैव लिंगायत समाजाच्या शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेनी दखल घेऊन कर्पे याची ही निवड केली आहे .
लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासाठी परीश्रम घेणारे शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे यांनी देशभरात विरशैव बांधवाची शिवा संघटना ऊभी केली आहे. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी परीश्रम घेत असताना त्यांच्या कार्याचा प्रसार प्रचार व्हावा यासाठी शिवा सोशल मीडीया सेल विभाग सुरु केला. या सेलच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी समाधान प्रभु भोरे यांची निवड झालेली आहे. बुधवार दि.4 रोजी धाराशिव येथे झालेल्या संघटनेच्या बैठकीत शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना सोशल मिडीया सेलच्या उपाध्यक्षपदी नागेश करपे यांची निवड करण्यात आल्याचे पत्र शिवा संघटनेचे मराठवाडा सरचिटणीस सुनिल शेरखाने यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी शिवा संघटनेचे मराठवाडा सरचिटणीस सुनील शेरखाने व शिवा संघटना सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष समाधान भोरे, शिवा संघटनेचे संघटक बापू लगदिवे, शिवा संघटनेचे शहर अध्यक्ष महेश उपाशे , शिवा संघटना सदस्य किशोर लगदिवे , विजय घोडके, बालाजी शिंत्रे, आदी उपस्थित होते. नागेश करपे यांच्या निवडीबद्दल संघटनेच्या सर्व पदाधीकारी व विरशैव मित्र परीवार व पत्रकार संघटनेकडून त्यांचे आभिनंदन होत आहे.