नळदुर्ग  शहिद बचित्तरसिंह यांना अभिवादन करताना केंद्रिय  गृहराज्यमंत्री अजयसिंह मिश्रा, आमदार राणाजगजीतसिंह पाटीलसह अन्य



नळदुर्ग,दि.०६: 

  सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग किल्ल्याशेजारील ऐतिहासिक , निझामकालीन शहिद बचित्तरसिंह (अलियाबाद ) पुल येथे केंद्रीय  गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी गुरूवारी भेट देऊन  या पुलाचे रक्षण करणाऱ्या शहिद बचित्तरसिंह यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 


गेल्या अनेक वर्षापासुन मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी माजी नगरसेवक विनायक अहंकारी हे इतिहासाचा मुक साक्षिदार असलेल्या या ऐतिहासिक पुलाचे पूजन करत असल्यामुळे श्री मिश्रा यांनी  विनायक अहंकारी यांचा गौरव केला. यावेळी मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील या पुलाचे महत्व, बचित्तरसिंह यांनी गाजवलेला पराक्रम याची माहिती विनायक अहंकारी यांनी दिली. सध्या हा पुल उच्च पातळी बंधा-याच्या पाण्याखाली आहे.  या ठिकाणी शहिद बचित्तरसिंह यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणी इतिहासप्रेमी नागरिकासह
शहरवासीयांनी केली. 


यानंतर श्री मिश्रा यांनी नळदुर्गच्या श्री खंडोबाचे दर्शन घेतले व गोलाई ते मुर्टा पाटी या रखडलेल्या बायपास रस्त्याच्या  कामाबाबत माहिती घेतली. 
यावेळी आमदार राणाजगजीतसिंह पाटील, माजी आमदार बाळा भेगडे, संतोष बोबडे, सुशांत भुमकर ,भाजप शहराध्यक्ष धिमाजी घुगे , माजी नगरसेवक संजय बताले ,  माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे,  नय्यर जहागिरदार , श्रमिक पोतदार,  यांच्यासह  भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top