नळदुर्ग ,दि. ०६

गुळहळ्ळी  ता.तुळजापूर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा  तानाजी  बनछेरे यांनी  पदभार स्विकारला तर उपसरपंचपदी सौ. शशिकला नवनाथ पटणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

 उपसरपंचपदी सौ. शशिकला पटणे यांची बिनविरोध झाली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी  गोपाळ घाटे तर साहय्यक म्हणुन  ग्रामसेवक निलगार एम सी. यानी काम पाहिले.   सौ. शशिकला नवनाथ पटणे यांचा उपसरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल केला होता. यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाले असे निवडणूक निरीक्षक गोपाळ घाटे यांनी जाहीर केले.

 यावेळी नुतून ग्रा.प. सदस्य कलिमा पटेल , सुभाष घोडके , कमलबाई क्षिरसागर , संगिता हलकंबे,प्रेमनाथ निकम, छायाबाई काळुंके उपस्थित होते. 
त्याचबरोबर आकाश हांजगे (पोलीस पाटील) बालाजी पाटील (तंटामुक्त अध्यक्ष) आनंदप्पा हांजगे,महादेव बाबर, राम हलकंबे, शिवराम लांडगे, महादेव हांजगे, विलास घोडके, विजय रेकळगे, विजय पाटील, विश्वनाथ हलकंबे, मधुकर बाबर गुरुजी, आप्पाराव घोडके,भिवा कांबळे,केराबाई काळुंके, सुरेखा पात्रे सह गावातील नागरिक  उपस्थित होते. 
यासाठी बालाजी बाबर,सोमेश हांजगे, खंडू हलकंबे, काशिनाथ हलकंबे, मारुती घोडके , महेश लांडगे, राम सोनकांबळे, अंकुश काळुंके , गणेश क्षिरसागर यांनी आदींनी जल्लोष साजरा केला.   तसेच नूतन सरपंच व उपसरपंच  आणि ग्राम पंचायत सदस्यांना हांजगे परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आले.
 
Top