प्रारंभी संस्थेचे सचिव मारुती बनसोडे यांनी या कार्यक्रमाची पार्श्वभूमी ,संकल्पना ,गरज व महत्व विस्ताराने सांगीतले. त्यानंतर साधन व्यक्ती म्हणून उपस्थित असलेले अमित घेरडे यांनी हवामान बदलाचे शेतीवर होणारे दुष्परिणाम सांगून त्यावर मात करण्यासाठी नव नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करावे व येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्यासाठी शेतकर्यानी संघटीतपणे लढा देण्याची गरज विषद केली. शेंद्रीय शेती व रासायनिक शेतीची सांगड घालून उत्पादन व उत्पन्न वाढविण्यावर भर दिला पाहिजे असे सांगीतले. तर अध्यक्षीय समारोप करताना सरपंच ग्रामपंचायत स्तरावर शेतकऱ्यांना जे जे सहकार्य करता येईल ते करणार व शेतीच्या अनेक योजना गावात राबविणार व शेतकऱ्यांना नविन तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रेरीत करणार असे सांगीतले. यावेळी हवामान बदलाचे शेतीवर होणारे दुष्परिणाम , गांडूळ खत कसे तयार करावे , अझोला हायड्रोपोनिक व अन्य महत्वपूर्ण माहिती असलेले पोस्टर्स प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.सहभागी शेतकऱ्यांना पाकीट डायरीचे वाटप करण्यात आले .या शेतकरी मेळाव्यात गावातील अनेक अल्प भूधारक , सिमांत व मध्यम वर्गीय शेतकरी उपस्थित होते.