तुळजापूर ,दि. २६ :
तुळजापूर तालुक्यातील काटी बीट मधील क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन बीटचे विस्तार अधिकारी अर्जुन जाधव यांच्या हस्ते ज्योत पेटवून मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले .
याप्रसंगी अति केंद्राचे केंद्रप्रमुख संजय सोलंकर ' केंद्राचे केंद्रप्रमुख तुकाराम क्षीरसागर प्रमुख पाहुणे होते . यावेळी काटी बीट मधील सर्व शाळांनी विविध क्रीडा प्रकारात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला .
सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूल तामलवाडीच्या मैदानावर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . सर्व विद्यार्थ्यांची प्रथम क्रीडा मैदानावर रॅली काढण्यात आली . यावेळी अर्जुन जाधव यांनी सर्व खेळाडूंनी खेळ विषयक भावना जपून या स्पर्धा पार पाडाव्यात .खेळामध्ये विजय पराजयापेक्षा खिलाडू वृत्ती ही महत्त्वाची असते . याचे भान सर्वांनी ठेवावे असे सांगून सर्व खेळाडूंना या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .कबड्डी , खो-खो , हॉलीबॉल या सांघिक खेळात बीट मधील सर्व संघानी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला .तर वर्ग १ ते ५ या गटात संगीत खुर्ची , लिंबू चमचा , थैला रेस व धावणे या स्पर्धा पार पडल्या .विविध समित्यांचे प्रमुख व समित्यांचे सदस्ययांचे सहाय्य मोलाचे ठरत आहे .
सर्वच क्रीडा प्रकारात प्रत्येक संघाने आपल्या खेळाचे कौशल्य दाखवून उपस्थितांची मने जिंकली .खोखो खेळांच्या सामन्यात सर्वाधिक चुरस पाहायला मिळाली .तर लहान गटातील संगीत खुर्ची , थैला रेस व लिंबू चमचा यामध्ये चुरशी बरोबर आनंद व गमतीशीर खेळाने सर्वजण हार्षोल्हासीत झाले . यावेळी महादेव वाघमारे , प्रभाकर जाधव , हर्षवर्धन माळी , रोकडे सर यांनी पंच म्हणून काम पाहिले .
बीटमधील सर्व शाळांनी प्रत्येक क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवला होता यावेळी खेळाडू बरोबर मार्गदर्शक उपस्थित होते . कदम सर , गुरव सर , रोकडे सर , मुख्याध्यापक महादेव वाघमारे सोमनाथ जामगावकर ,संतोष भालेकर , ज्योतिबा जाधव , अकबर मुलानी , विठ्ठल नरवडे , हर्षवर्धन माळी , उत्तरेश्वर पैकीकरी 'राजाराम वाघमारे , राजेंद्र कदम , तात्यासाहेब चौगुले , पांडुरंग जावळे ,अमोल कविटकर ,संगमेश्वर साठे हेमंत जोशी ,विशाल कंदले ,सविता गोबूर,सुरेखा दराडे , महिला शिक्षिका श्रीमती जयमाला वटणे , स्मिता पाटोळे , छाया सूर्यवंशी , विभावरी गायकवाड , हबू हे या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत .