नळदुर्ग,दि. ०६
येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांचा माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, कार्याध्यक्ष रामचंद्र आलुरे, सहसचिव प्रकाशराव चौगुले, शहेबाज काझी , आश्लेष मोरे, डॉ. शिवाजीराव मदन, प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव, प्राचार्य डॉ. मणेर, प्राचार्य डॉ. चंदनशिव, प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, प्राचार्य डॉ. दापके हे उपस्थित होते .
याप्रसंगी बसवराज पाटील यांनी सांगितले की 78 तालुक्याचा असलेला मतदारसंघ सतीश चव्हाण हे सांभाळत आहेत हे सदयाच्या काळामध्ये फार जिकरीचे काम असून माणसं कशी एकत्रित करावी आणि माणसांची मन कशी जिंकावी ते यांच्याकडून शिकले पाहिजे . याप्रसंगी आमदार विक्रम काळे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, शिक्षकांचे व पदवीधरांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्या सत्काराला देताना आमदार सतीश चव्हाण म्हणाले कि, नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपल्याला स्वतःमध्ये बदल करून घ्यावा लागेल आणि विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले. तर अध्यक्षीय समारोप करत असताना मधुकरराव चव्हाण यांनी सतीश चव्हाण यांच्या कार्याचा गौरव आपल्या मनोगतातुन व्यक्त केला स्व. वसंतराव काळे यांचा वसा घेऊन सतीश चव्हाण आणि विक्रम काळे पदवीधरांचे आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असतात असा गौरवोद्गार त्यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपातून केला.
यावेळी डॉ. शिवाजीराव मदन, रामचंद्र दादा आलुरे, शहबाज काझी, प्रा. शौकत पटेल, डॉ. घनश्याम जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ. संतोष पवार व आभार डॉ. सुभाष राठोड यांनी मांडले. या कार्यक्रमास मराठवाड्यातून आलेले प्राध्यापक वृंद, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.