नळदुर्ग, दि.१० :
शहिद बचित्तरसिंग यांच्या जयंती निमित्त नळदुर्ग शहरात अभिवादन करण्यात आले. प्रारंभी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, यांच्या हास्ते प्रतिमेचे पुजन करुन आभिवादन करण्यात आले.
हैद्राबाद मुक्ती संग्रमाच्या लढ्यातील आॕपरेशन पोलो दराम्यान नळदुर्ग येथिल बोरी नदीवरीला पुल वाचवताना शहिद झालेले शीख रेजिमेंटचे हवालदार बचित्तरसिंग यांच्या जयंती निमित्त मंगळवारी शहरातील राजमाता आहिल्यादेवी होळकर चौक याठिकाणी अभिवादन करण्यात आले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक सिद्धेश्वर गोरे व मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या हस्ते शहिद बचित्तरसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आयोजाक विनायक अहंकारी व कमलाकर चव्हाण यांनी हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्याचा इतिहास वर्णन केला व इतिहास अभ्यासक डाॕ. सतिश कदम यांनी बचित्तरसिंह यांच्या अज्ञात व दुर्लक्षित इतिहासावर कशा प्रकारे प्रकाश टाकला याची माहिती दिली.
यावेळी सुशांत भुमकर , संतोष पुदाले, संजय विठ्ठल जाधव, ज्योतिबा येडगे, धिमाजी घुगे, उमेश नाईक, मुकूंद नाईक, सुशांत भुमकर, , नितीन कासार, नय्यर जहागीरदार, अमृत पुदाले, पद्माकर घोडके, श्रमिक पोतदार, राहुल हजारे, सरदारसिंग ठाकूर, ज्ञानेश्वर घोडके, विलास येडगे, उत्तम बनजगोळे, शिवाजी नाईक, सुहास येडगे, भगवंत सुरवसे, आय्युब शेख, विशाल डुकरे, दादासाहेब बनसोडे, अमर भाळे, मंगेश महाबोले, मारूती घोडके आदीजन उपस्थित होते.