भूम,दि. १० : धनंजय गोफणे
गटशिक्षण कार्यालय पंचायत समिती भुम याच्या वतीने तालुका स्तरीय महिला शिक्षीकांचा मेळावा आयोजित करण्यात आले होते. गट शिक्षणाधिकारी भट्टी यांच्या संकल्पनेतुन मिळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षा जेष्ठ शिक्षिका श्रीमती सौ शैलजा गायकवाड तर प्रमुख पाहूणे म्हणून विस्तार अधिकारी जगदाळे , कोल्हे, उपस्थित होते. या मिळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी प्रा. डॉ जगदाळे विधिज्ञ श्रीमती तावरे श्रीमती दराडे या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती कोकाटे श्रीमती पाटील यांनी केले. तालुक्यातील महीला शिक्षकाना गटशिक्षण कार्यालयाकडून महिलासाठी व्यासपीठ मिळल्याबद्दल समाधान व्यक्त केले सर्व महिला भगिनींनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.