काटी, दि.२०:उमाजी गायकवाड
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडी यात्रेच्या यशस्वी आयोजनानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हात से हात जोडो अभियानाची सुरुवात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.धीरज भैय्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथून करण्यात आली.
रविवार दिनांक 19 रोजी सायंकाळी सात वाजता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज भैय्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली हात से हात जोडो अभियानाच्या रथयात्रेचे तुळजापूर तालुक्यातील काटी येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याकडून फटाक्याच्या आतिषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले. अभियानांतर्गत जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज (भैय्या) पाटील यांच्या समवेत पक्षाचे कार्यकर्ते सरपंच सुजित हंगरगेकर,माजी चेअरमन सयाजीराव देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, शिवसेनेचे राजेंद्र ढगे आदीं कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन लोकांशी संवाद साधत भारत जोडो यात्रेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचला. तसेच काँग्रेसने मोदी सरकार विरोधातील व केंद्र सरकारच्या त्रुटी सांगणारे व मोदी सरकारच्या ना करते पणाचे आठ वर्ष हे आरोप पत्रही वाटण्यात आले. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांच्या सहीचे एक पत्रही वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड धिरज भैय्या पाटील म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारची धोरण म्हणजे स्वतःचा विकास करणे असून आठ वर्षापूर्वी त्यांनी दिलेली आठ वर्षांपूर्वी त्यांनी दिलेली बेरोजगारी महागाई काळा पैसा देशात आणणे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव देणे प्रत्येक बँक खात्यात 15 लाख जमा करणे माघारी रोखणे इंधन व जीवनाची वस्तूची भाव स्थिर ठेवणे यापैकी एकही आश्वासन पूर्ण केली नाही देशातील सार्वजनिक उद्योग विकास विकायला काढले आहेत या देशाचा भाजप सरकारने विकास केला नसून विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. केंद्रातील भाजप सरकार सध्या प्रायव्हटायजेशनकडे वाटचाल करत असून अनेक गोष्टी त्यांनी देशातील खाजगी धनाढ्यांच्या पदरी टाकायला सुरुवात केली आहे. विमानतळे, बंदरे यांचे खाजगीकरण होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. भाजपची चुकीचे धोरण सर्वसामान्य नागरिकांना घरोघरी जाऊन सांगण्यासाठी तोडफोडीचे सरकार उलथून टाकण्यासाठी काँग्रेसने हात से हात जोडो अभियान सुरु केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आगामी निवडणुकात भाजपचे सरकार उलथून महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज भैया पाटील, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, प्रदीप साळुंके, माजी सरपंच शामराव आगलावे, अभिमान बामणकर, जयाजी देशमुख प्रकाश गाटे, रामेश्वर लाडूळकर, बबन हेडे, चंद्रकांत काटे,अजय देशमुख, ग्रा.पं. सदस्य अमोल गावडे प्रकाश सोनवणे, भैरी काळे, तानाजी हजारे, शिवलिंग घाणे, आबा गाढवे सुनील गायकवाड कय्युम कुरेशी, राजेंद्र ढगे, संताजी गायकवाड, सयाजी गायकवाड, अखिल पठाण आदींसह महाविकास आघाडीतील कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.