तुळजापूर, दि. २३:उमाजी गायकवाड
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुळजापूर येथे डॉ. रमेश लबडे, डॉ.संतोष गायकवाड, डॉ.शेख मॅडम व डॉ. संतोष गवते या चार तज्ञ डॉक्टरांनी एकत्र येत सुरु केलेल्या जनश्रु हेल्थ केअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड द्वारा संचलित "लाईफ केयर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल" चा शानदार शुभारंभ बुधवार 22 मार्च रोजी तुळजाभवानीचे मुख्य पुजारी महंत तुकोजी बुवा महाराज यांच्या शुभहस्ते फित कापून व श्रीफळ वाढवून करण्यात आला.
या चार डॉक्टरांनी एकत्र येऊन येथील येथील लातूर रोडवरील नवीन बसस्थानक जवळील कृष्णा लॉजच्या समोरील भव्य इमारतीमध्ये सुरु करण्यात आलेल्या या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे तुळजापूरसह परिसरातील ग्रामीण भागातील रुग्णांना सोलापूरला उपचारासाठी जाण्याची फारशी गरज पडणार नाही. सर्व सोयी सुविधा देण्यासाठी व सर्व आजारांवर एकाच छताखाली उपचार करण्याच्या उद्देशाने या चारही डॉक्टरांनी "लाईक केअर क्रिटीकल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल" सुरु केले असून सर्व रुग्णांना योग्य उपचार मिळणार आहेत. तसेच या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना 24 तास सेवा मिळणार असून ग्रामीण भागातील रुग्णांना परवडेल व त्यांच्या सोयीचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तुळजापूर शहरात सुरु झाल्याने रुग्णांचे मानसिक व आर्थिक नुकसान टळणार आहे.
हॉस्पिटलच्या वतीने 23 ते 25 मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉ.रमेश लबडे, डॉ. संतोष गायकवाड, डॉ.शेख, डॉ. संतोष गवते यांनी दिली.
हॉस्पिटलच्या शुभारंभ प्रसंगी विविध मान्यवरांनी भेटी देऊन हॉस्पिटलची पहाणी व चारही डॉक्टरांना पुढील वाटचालीसाठी त्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. अनेक उपस्थित मान्यवरांनी हॉस्पिटलविषयी समाधान व्यक्त केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे माजी उपसभापती चित्तरंजन सरडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मुकुंद डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.शेख मॅडम, डॉ.संतोष गायकवाड,डॉ.संतोष गवते व डॉ रमेश लबडे यांनी एकत्र येत सर्व सोयीसुविधा व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून स्थापन केलेल्या लाईफ केयर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घघाटनप्रसंगी पत्रकार उमाजी गायकवाड , पत्रकार चांदसाहेब शेख,राहुल साठे,मंगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे गणेश पवार यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ, लोकप्रतिनिधी व मंगरूळ परिसरातील नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी शंकर लबडे, अजय पवार, प्रवीण माने, नारायण वडणे,अनिकेत गायकवाड,बालाजी पानढवळे, यशवंत धुरगुडे यांनी परिश्रम घेतले.