मोफत नेत्र तपासणी शिबिरात ४०० लाभार्थी रुग्णाची तपासणी; लवकरच रुग्णांना मोफत चष्म्याचे होणार वाटप
नळदुर्ग,दि. १२ : अरुणकुमार नाईक
श्री क्षेत्र रामतीर्थ देवस्थान मंदिरात आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराचे उदघाटन माजी मंञी मधुकरराव चव्हाण , महंत श्री विष्णूप्रसाद शर्मा महाराज यांच्या हास्ते करण्यात आले. या शिबीरात ४०० लाभार्थी रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३५ मोतीबिंदू रुग्ण आढळले असुन या रुग्णावर उस्मानाबाद व हैद्राबाद येथिल रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या शिबीराचा जवळपास ४० ते ५० शालेय विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे.
श्री रघुनाथजीं महाराजांच्या कृपेने रामतीर्थ देवस्थान नळदुर्ग यांच्या वतीने महंत श्री विष्णू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व दिल्ली येथील नामांकित शिवम ऑप्टिक्स, लेडीज सर्कल इंडिया व नेत्र चिकित्सक डॉ. आनंद काटकर , वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यजित डुकरे यांच्या सहकार्याने मोफत नेञ तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले
रामतीर्थ येथे पहिल्यांदाच झालेल्या या शिबिरात नळदुर्गसह परिसरातील लोहगाव, चिकुंद्रा, येडोळा, नांदगाव, अणदूर, जळकोट, वागदरी येथील लाभार्थी रुग्णांचा समवेश आहे.
या शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आणि महंत श्री विष्णूप्रसाद शर्मा महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री शुक्ला महाराज, सौ. सुभद्रा मुळे, कल्पना गायकवाड, निवृत्त मुख्याध्यापक बलभीम मुळे, पत्रकार विलास येडगे, राम भक्त माजी नगरसेवक सचिन डुकरे, भाजपचे श्रमिक पोतदार, प्रभाकर घेडके, श्रीकांत पोतदार, बाबुराव राठोड, लखन भोसले, जमन ठाकूर, डॉ. आनंद काटकर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
या शिबिरात मोफत नेत्र तपासणीमध्ये ४०० लाभार्थी रुग्णाची तपासणी करण्यात आली. मोतीबिंदूचे ३५ रुग्ण आढळले आहे. लाभार्थी रुग्णांच्या चष्म्याचा नंबर काढुण व फ्रेमची साइज याचा मेळ घालून ते तयार करून १० ते १५ दिवसात त्या, त्या लाभार्थी रुग्णांस देण्यात येणार असल्याचे डॉ. आनंद काटकर यांनी बोलताना सांगितले. तसेच सध्या डोळे येणे या साथीच्या आजाराबाबत काळजी घेण्याबाबत काटकर यानी मार्गदर्शन केले.
आजच्या धकााधकीच्या जीवनशैलीत अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांनी ग्रासले आहे. हे आजार झाल्यानंतर त्याचे परिणाम शरीराच्या इतर अवयवांवर होतात. मधुमेहाचा परिणाम सर्वात अगोदर डोळ्यांवर होतो. त्यामुळे डोळ्यांची निगा कशी राखायची याची माहिती नसल्याने अनेकांना अंधत्व आल्याचे निदर्शनास येते.त्याकरिता मोफत नेञ तपासणी शिबीर आयोजित करुन ग्रामीण भागातील नागरिकाना लाभ मिळवुन देण्याचे स्तुत्य उपक्रम देवस्थान व राम भक्तानी राबविल्याचे कौतुक माजी मंञी मधुकरराव चव्हाण यानी केले.