जयदेव म्हमाने यांची युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) या संघटनेच्या वतीने व इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी (IOC) यांच्या मार्फत होणार-या स्पर्धेत एकमेव भारतीय पंच म्हणून निवड
जागतिक पँक्रेशन स्पर्धा 2023 रियाध, सौदी अरेबिया 21 ते 28 ऑक्टोबर 2023
काटी,दि.१३: उमाजी गायकवाड
धाराशिव जिल्यातील तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) चे व सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले किक बॉक्सिंग मधील आंतरराष्ट्रीय खेळाडू जयदेव घनश्याम म्हमाणे यांची दि. 21 ते 28 ऑक्टोबर 2023 या कालावधीत रियाध (सौदी अरेबिया) येथे होणार्या युनायटेड वर्ल्ड रेसलिंगअंतर्गत स्पर्धेसाठी वर्ल्ड कॉम्बॅट गेम्समध्ये पंच म्हणून निवड झाली आहे.
या स्पर्धा 18 क्रीडाप्रकारात होणार असून त्यामध्ये रेसलिंग, पँक्रेशेन, किकबॉक्सिंग , जिदो,तायकन्दो,इ. रेसलिंगसर्धेत जगातून 16 देशातून प्रत्येकी एक पंच निवडण्यात आला असून भारतातर्फे या खेळात जयदेव म्हमाने यांची निवड करण्यात आहे. या स्पर्धेसाठी हजारांहून अधिक खेळाडू येणार असल्याची शक्यता असून या स्पर्धेत सर्वात रोमांचक लढाऊ खेळ आणि मार्शल आर्ट्स गेम्स खेळले जाणार आहेत. यापूर्वी वर्ल्ड कॉम्बॅट गेम्स 2013 मध्ये सेंट पीटर्सबर्ग (रशिया) येथे खेळविण्यात आल्या होत्या.
यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग (यू डब्ल्यू डब्ल्यू) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी (आय ओ सी) आणि यू डब्ल्यू डब्ल्यू एशियाला ट्रेडिशनल रेसलिंग अँड पँक्रॅशन करीता ,ओलंपिक कौन्सिल ऑफ एशिया.(ओसीए) द्वारे मान्यता प्राप्त आहे. आय टी डब्ल्यू पी एफ,आय ओ सी च्या मान्यतेने वर्ल्ड कॉम्बॅट गेम्स 2013 सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी (आय ओ सी) च्या संरक्षणाखाली खेळांमध्ये भाग घेत या स्पर्धांमध्ये जयदेव म्हमाणे यांनी आशिया खंडाचे नेतृत्व करित एकमेव खेळाडू होण्याचा बहुमान मिळविला आणि तबल 10 वर्षानी पंच म्हणून निवड झालेला केवळ एकमेव खेळाडू आहे. जयदेव म्हमाने यांची निवड झाल्याने जगात धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. हि अभिमानाची बाब आहे.
यू डब्ल्यू डब्ल्यू सदस्य सर्व आय ओ सी आणि ओ सी ए द्वारे आयोजित खेळांमध्ये भाग घेऊ शकतात. म्हणूनच, यू डब्ल्यू डब्ल्यू सदस्य म्हणून केवळ आमच्या राष्ट्रीय महासंघाने भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (आय ओ ए) च्या पथकात सहभाग घेतला होता.
युवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या मान्यतेने २०१७ मध्ये आम्ही “ओ सी ए च्या एशियन इंडोर व मार्शल आर्ट गेम्स मध्ये अश्गाबात, तुर्कमेनिस्तान येथे 45 सदस्यांच्या प्रतिनिधी समवेत पारंपारिक कुस्ती शैली आणि बेल्ट रेसलिंगमध्ये भाग घेतला आणि आपल्या भारत देशासाठी चार कांस्यपदक जिंकले. त्यामधे जयदेव म्हमाने यांचा समावेस होता तसेच यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग (यू डब्ल्यू डब्ल्यू) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी (आय ओ सी) आणि यू डब्ल्यू डब्ल्यू एशियाला ट्रेडिशनल रेसलिंग अँड पँक्रॅशन युनायटेड वर्ल्ड रेसलिंग स्पर्धेसाठी भारतातर्फे तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील अंतरराष्ट्रीय खेळाडू जयदेव म्हमाने यांची निवड झाल्याने त्यांच्या निवडीचे सर्वत्र आभिनंदन होत आहे.