मराठा आरक्षणासाठी प्राणाची आहुती दिलेल्या माने कुटुंबीयांचे आ. पवार व भाजपा जिल्हाध्यक्ष चालुक्य यांच्याकडून सांत्त्वन



उमरगा ,दि.१३

मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या किसन चंद्रकांत माने यांच्या कुटुंबीयांची औशाचे आमदार अभिमन्यू पवार आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य यांनी भेट घेऊन सांत्वन केले. 


मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार सकारात्मक आहे. वेळोवेळी आम्ही मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा केला आहे आणि यापुढेही करणार आहोत. म्हणून मराठा बांधवानी संयम बाळगावा असे आवाहन आ. पवार आणि भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.चालुक्य यांनी यावेळी केले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान उमरगा तालुक्यातील किसन माने या तरूणाने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यू पवार आणि धाराशिव भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य यांनी माने कुटुंबीयांची भेट घेतली. माने कुटुंबीयांचे सांत्वन करत सध्याचे सरकार हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी प्रयत्न करत असून मराठा समाजाने संयम बाळगावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top